बांबवडे गाव चे नूतन सरपंच श्री गजानन निकम
बांबवडे : बांबवडे गाव च्या सरपंच पदी श्री गजानन निकम यांची निवड झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून हे पद रिक्त होते.
बांबवडे चे माजी सरपंच विष्णू यादव यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. विष्णू यादव हे कर्णसिंह गटाचे कट्टर समर्थक होते. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हापरिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून त्यांच्यात वितुष्ट आले. त्यातच बांबवडे येथील जनावरांचा बाजार मधील दुकानगाळे लिलाव प्रक्रियेतून वाद निर्माण झाला. या सगळ्याचे पर्यावसान विष्णू यादव यांच्या राजीनाम्यात झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. दरम्यान श्री गजानन निकम यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी आर.व्ही. माळी यांनी काम पहिले.