बौद्ध विकास मंडळ मुंबई, परखंदळे चा २० व २१ मे रोजी जयंती सोहळा
बांबवडे ( प्रतिनिधी ) : बौद्ध विकास मंडळ मुंबई, परखंदळे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने महामानवांचा जयंती सोहळा २० व २१ मे रोजी परखंदळे इथं संपन्न होणार आहे.
या जयंती सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान २० मे रोजी धम्म ध्वजारोहण, तसेच महिला मंडळाचे स्नेह संमेलन होणार आहे. तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दि.२१ मे रोजी जाहीर सभा असणार आहे. या सभेस प्रा. प्रकाश नाईक, प्रा.डॉ. बापूसाहेब कांबळे, बी.एस. कांबळे आदि मान्यवर प्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहेत.
या जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्यासंदर्भात अध्यक्ष गिरीश कांबळे, डॉ. बापूसाहेब कांबळे, संभाजी कांबळे, सुदाम कांबळे, व मंडळाचे पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.