इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस परिषदेच्या सह अध्यक्ष पदी ‘कोरे फार्मसी कॉलेज ‘ चे प्राचार्य डॉ जॉन डिसोझा यांची निवड
वारणानगर / प्रतिनिधी
चित्रक विद्यापीठ राजपुरा पंजाब येथे दि.२२ ते २४ डिसेबंर रोजी तीन दिवस होणाऱ्या ६९व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस परिषदेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सह अध्यक्षपदी तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ जॉन डिसोझा यांची निवड झाली आहे.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन संचलित काँग्रेस परिषद ही देशात औषध निर्माण शास्त्र विषयक ज्या परिषदा होतात त्यापैकी सर्वात महत्त्वाची काँग्रेस परिषद ही देशात कार्यरत आहे. औषध विषयक नवनवीन प्रयोग संशोधन चर्चा या परिषदेच्या माध्यमातून घडवून आणते. औषधनिर्माण क्षेत्राशी निगडीत शाळा महाविद्यालय कंपनी उद्योग या क्षेत्रातील सुमारे पाच लाख तज्ज्ञ अभ्यासू या परिषदेत सहभागी होतात.
राष्ट्रीय पातळीवरील या परिषदेत शिवाजी विद्यापीठाला डॉ.जॉन डिसोझा यांच्या माध्यमातून प्रथमच प्रतिनिधित्व व काम करण्याची संधी मिळाली आहे.