“जीएसटी” ला तिन्ही सभागृहात मंजुरी
बांबवडे : “जीएसटी” ला देशातील विधानसभा,राज्यसभा लोकसभा अशा तिन्ही सभागृहाने मंजुरी दिली असून लवकरच आर्थिक वर्षात जीएसटी लागू होणार आहे.
येत्या नवीन वर्षात इतर टॅक्सना वगळून फक्त एकच कर आपल्याला द्यावा लागणार आहे.”जीएसटी” म्हणजे Goods,Service Tax .याचाच अर्थ खरेदी विक्री होणाऱ्या वस्तू,तसेच पुरविल्या जाणाऱ्या, ज्या सेवांबद्दल घेतला जाणारा महसूल ,व इतर सर्व टॅक्स या एकाच छताखाली एकवटला जाणार आहे. यामुळे जकात, वॅट ,खरेदी असे अनेक छुपे कर बंद होणार असून त्याएवजी फक्त “जीएसटी” भरावा लागणार आहे. असे शासनाने जाहीर केले आहे. परंतु हा टॅक्स किती टक्के असणार आहे. याबाबत अद्याप निश्चिती नाही. त्यामुळे हा टॅक्स सामान्य जनतेला किती परवडणार अथवा नाही, याबाबत सांगता येत नाही.