शिराळा निवडणुकीसाठी १४१ पैकी ७२ अर्ज वैध
शिराळा (प्रतिनिधी ): शिराळा नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी १७ प्रभागांसाठी दाखल झालेल्या १४१ अर्जा पैकी ७२ अर्ज छाननीत अवैध ठरले असून ६९ अर्ज वैध ठरले आहेत.
सूचक नसणे, पक्षाचा ए.बी.फॉर्म नसणे, सुचकाची सही नसणे, उमेदवाराची सही नसणे, अर्जावर उमेदवार व सूचक सही नसणे, जातपडताळणी दाखला पोहच नसणे या कारणामुळे अर्ज अवैध ठरले आहेत.
प्रभाग एक मधून विक्रमसिंह विजयसिंह नाईक. प्रभाग दोन मधून सचिन नलवडे, प्रभाग तीन मधून माजी उपसरपंच सुनील कवठेकर. प्रभाग ४ मधून सविता यादव, प्रभाग ५ मधून शारदा गायकवाड. प्रभाग ६ मधून जमीला बाबासो मुजावर, ज्योती प्रवीण शेटे, स्वप्नाली सुरेश शेळके, नेहा नरेंद्र सूर्यवंशी. प्रभाग ७ मधून माधुरी शिवाजीराव शिंदे, रुपाली विश्वासराव कदम. प्रभाग ८ मधून अर्चना बसवेश्वर शेटे, छायाताई शंकर कदम, वृषाली कमलाकर सूर्यवंशी. प्रभाग १० मधून विजय थोरबोले, प्रजित यादव, उमेश कुलकर्णी. प्रभाग ११ मधून वासिम मोमीन, मकरंद उबाळे, संतोष देशपांडे, राहुल गायकवाड, प्रभाग १२ मधून शोभाताई रमेश कांबळे. प्रभाग १३ मधून अर्चना महादेव कदम, नेहा सूर्यवंशी. प्रभाग १४ मधून धनाजी चव्हाण, महादेव पांडुरंग कदम, सत्यजित दिलीपराव कदम, दीपक पवार. प्रभाग १५ मधुन सुवर्णा धनाजी चव्हाण, छाया सदाफळे, आकांक्षा दीपक पवार, सुप्रिया प्रताप दिलवाले. प्रभाग १६ मधून विनोद घाटगे, प्रभाग १७ मधून रफिक आत्तार या प्रमुख दावेदारांचे अर्ज अवैध झाल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. याचा विविध पक्षांना मोठा फटका बसला आहे.
नगरपंचायतसाठी एकूण १७ प्रभाग आहेत.प्रभाग व कंसात अवैध झालेले अर्ज असे १(५),२(४),३(३),४(२),५(३),६(६),७(५),८(५),९(५),१०(४),११(६),१२(२),१३(३),१४(८)१५(४),१६(४),१७(३).
११ मे रोजी अर्ज माघार असल्याने माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.