‘विश्वास विद्यानिकेतन ‘ च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
शिराळा : विश्वास विद्यानिकेतन चिखली तालुका शिराळा येथील विद्यार्थी कु. हर्षद संभाजी जानकर याची९ वी साठी नवोदय विद्यालय पलूस इथं निवड झाली आहे. या निवडीमुळे ‘ हर्षद ‘ चे सगळ्याच स्तरातून अभिनंदन होत आहे.
हर्षद च्या या यशात एस.एस. खुटाळे सर ,प्राचार्य देसाई सर, अधीक्षक आर.के. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमरसिंह नाईक(पापा ), कार्याध्यक्ष रोहित नाईक ( भैया ) यांची प्रेरणा मिळाली.