खासदार राजू शेट्टी यांना मंदसौर इथं अटक : किसान मुक्ती यात्रेला सुरुवात
मध्यप्रदेश (वृत्तसंस्था ) सौजन्य : मध्यप्रदेश येथील मंदसौर इथं स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज पासून किसान मुक्ती यात्रेला सुरुवात झाली. या शेतकरी यात्रेदरम्यान मंदसौर येथील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिकलश नेताना, पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी शेट्टी यांच्यासोबत शेकडो शेतकऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मंदसौर हल्ल्यातील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश राजू शेट्टी दिल्लीतील जंतरमंतर ला घेवून जाणार होते. पण या अगोदरच पोलिसांनी खासदार शेट्टी यांना अटक केली आहे.
खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील ‘किसान मुक्ती यात्रे ‘ ला मध्यप्रदेश येथील बुढा मधून सुरुवात झाली.
या मोर्चात राजू शेट्टी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव,यांच्यासह २५ राज्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत.