आमदार राणे यांनी मत्स्य आयुक्तांना मासे फेकून मारले
सिंधुदुर्ग : मच्छीमारांच्या विविध प्रश्नांसंबंधी आमदार नितेश राणे यांनी मत्स्य आयुक्तांची भेट घेतली. दरम्यान चर्चा सुरु होतानाच वातावरण तापले ,आमदार राणे यांनी रागाच्याभरात आयुक्तांच्या टेबलवर माश्यांची टोपली रिकामी केली.
चर्चे दरम्यानही स्वाभिमान संघटनेचे नेते व कॉंग्रेस चे आमदार नितेश राणे आक्रमक होते. संताप अनावर झाल्याने आमदार राणे यांनी आयुक्तांना मासे फेकून मारले.