३ मे रोजी कडव्यात भव्य निकाली कुस्त्या : यात्रा कमिटी कडवे
मलकापूर (प्रतिनिधी ) :
कडवे तालुका शाहुवाडी येथे श्री विठ्ठलाई देवीच्या यात्रे निमित्त बुधवार 3 मे रोजी भव्य निकाली कुस्तीचे जंगी मैदान आयोजित केले असल्याची माहिती, पंचायत समिती सदस्य विजय खोत व अमरसिंह खोत यांच्या सह यात्रा कमिटीच्या वतीनं देण्यात आली.
या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची लढत पै. रोहीत पटेल यांचा पट्टा पै. सुरज निकम विरूद्ध जागतिक कुस्ती स्पर्धा विजेता पै. प्रविण भोला यांच्या त होणार आहे. दोन नंबरची लढत उपमहाराष्ट्र केसरी नंदु अबदार आणि तेजस आखाडा दिल्लीचा पै. युधिष्ठर यांच्या त, तीन नंबर साठी पै. शिवाजी पाटील कापशी विरूद्ध पै. संतोष दोरवड शाहू साखर यांच्या त होणार आहे.
या प्रमुख लढती बरोबरच पै. सरदार सावंत विरूद्ध राजाराम यमगर,शाहुवाडी केसरी पै. अभिजित भोसले विरुद्ध प्रविण सरक यांच्या ही लढती होणार असून, अन्य कुस्त्या ही जोडल्या आहेत. या जंगी कुस्ती मैदानाचा कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा, असे आव्हान ही यात्रा कमिटीच्या वतीने केले आहे.