महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने पन्हाळा तहसील वर मूक मोर्चा
कोडोली प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्यातील हातगाव कांबी ता.शेगाव येथील एका अल्पवयीन नाभिक समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. याबाबतची फिर्याद संबंधितांनी पोलिसात दिली आहे. तसेच आरोपी संभाजी भराट पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या केसचा निकाल कोर्टाने लवकर द्यावा .या मागणीसाठी महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या कडून मूक मोर्चा काढून कोल्हापूर शाखेच्या वतीने आज पन्हाळा तहसीलदार रामचंद्र चोबे यांना देण्यात आले आहे. तसेच येत्या सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी हातगाव कांबी ता.शेगाव येथेही मूक मोर्चा काढणार असल्याचे नाभिक मंडळा कडून सांगण्यात आले.
यावेळी नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख जयवंत जाधव, जिल्हा चिटणीस सरदार झेंडे, पन्हाळा तालुका अध्यक्ष सदाशिव सूर्यवंशी, उपाध्यक्ष सागर जाधव, पन्हाळ तालुका प्रसिद्धी प्रमुख अर्जुन संकपाळ तसेच नाभिक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.