अक्षय तृतीयेला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी एल्गार -खासदार राजू शेट्टी
कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे,तो कर्जमुक्त झाला पाहिजे,यासाठी युवा संघटनेच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढणार आहोत. त्याची सुरुवात शिरोळ तालुक्यातून २८ एप्रिल म्हणजेच अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. अशी माहिती हातकणंगले मतदारसंघाचे खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राहू शेट्टी यांनी दिली.
२८ एप्रिल ला सुरु झालेली रॅली संपूर्ण राज्यात काढली जाणार असून,या रॅली प्रसंगी कर्जमुक्तीचे फॉर्म शेतकऱ्यांकडून भरून घेतले जाणार आहेत. या रॅली ची सांगता ४मे रोजी कोल्हापुरात होईल. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर विरत मोर्चा काढण्यात येईल.आणि आंदोलन किती तीव्र होईल,हे त्यावेळीच कळेल.पण कोणत्याही परिस्थितीत शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे,या मुद्द्यांवर आम्ही ठाम असणार आहोत.असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.