कोडोली त छ. शिवाजी महाराजां च्या प्रतिमेचे जल्लोषी मिरवणूक
कोडोली प्रतिनिधी:-
कोडोली ता.पन्हाळा येथे एक गाव एक शिवजयंती उत्साहात साजरी झाली. आज पहाटे ७ वाजण्याच्या दरम्यान पन्हाळा येथून ज्योत आणण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोडोलीतील वैभवनगर येथील दत्त मंदीर पासून छ.शिवाजी महाराज यांच्या पालखी व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री.सयाजी मोहिते यांच्या हस्ते पालखीचे पूजन व महाराजांच्या प्रतिमेस हार घालून करण्यात आली. यावेळी युवा नेते विश्वेश कोरे, सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखिल पाटील, अमर पाटील, तसेच मान्यवर उपस्थित होते.
छ. शिवाजी महाराज यांच्या मिरवणूकीची सुरुवात दत्त मंदिरं पासून सर्वोदय चौक , मेन रोड, पेठ लाईन करत शिवाजी चौक मध्ये येऊन मिरवणुकीचा समारोह झाला, या मिरविणूकीमध्ये कबनुर येथील ‘ धर्मवीर ‘ हे महिलांचे झांजपथक तसेच नांदणीहुन हत्तीचा ही समावेश होता. या मिरवणुक मध्ये मनमोहक अशी आतिषबाजी करण्यात आली. यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सह्य.पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.