तोट्यात असलेल्या जिल्हा बँकांचे विलीनीकरण करा- मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्रात तोट्यात सुरु असलेल्या जिल्हा बँकांचे शिखर बँकेत विलीनीकरण करा, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेय.
राज्यात एकूण ११ जिल्हा बँका तोट्यात सुरु आहेत. पैकी ९ बँकांची स्थिती अधिकच नाजूक आहे. अशा बँकांचे विलीनीकरण व्हावे. असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
खरीप हंगामपूर्व तयारी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीवेळी अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यातील सोलापूर,बीड,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,जालना,बुलढाणा, वर्धा,नागपूर या बँका आर्थिक दृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापूर्वी पिक कर्जाचे वाटप होणे गरजेचे आहे. परंतु काही बँका हे पिक कर्ज वाटप करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे अशा बँकांचे विलीनीकरण व्हावे,अशी सूचना मुख्यमंत्री यांनी मांडली.