कोपार्डेत धाडसी चोरी :बारा तोळे सोन्यासह रोकड लंपास
मलकापूर (प्रतिनिधी )
कोपार्डे तालुका शाहुवाडी येथील राजू बंडू कारंडे यांच्या घरातील सुमारे बारा तोळे सोन्यासह रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरली असल्याची नोंद शाहुवाडी पोलीसांत झाली असून, घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली .श्वान पथक आणि ठसे तज्ञ देखील दाखल.
घटनास्थळा वरून मिळालेल्या माहिती नुसार कोपार्डे गावच्या यात्रे निमित्त आयोजित कार्यक्रम बघण्यासाठी गेलेल्या संधीचा फायदा घेऊन, राजू बंडू कारंडे यांच्या घराची कौले काढून घरात तिजोरीतील ठेवलेले सुमारे बारा तोळे सोने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घरात कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, उपनिरीक्षक श्रीराम पडवळ यांच्या सह शाहुवाडी पोलीसानी भेट दिली.