मांगले इथं शॉक लागून म्हैशी चा मृत्यू
शिराळा : शिराळा तालुक्यातील मांगले गावाजवळ विजेच्या तारा तुटून लागलेल्या शॉकमुळे बाबुराव आण्णा कांबळे रा.मांगले यांच्या दोन दुभत्या म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेत सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
.बाबुराव कांबळे म्हैशी घेवून आज दुपारी मोरणा नदीवर पाणी दाखवण्यासाठी गेले होते .पाणी पाजून परतताना विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. त्याचवेळी दोन म्हशीही तारांच्या खाली आल्या .त्याच क्षणी शॉक लागून दोन म्हशीचा जाग्यावर मृत्यू झाला. तारा तुटून डांबरी रस्त्यावर पडल्या मुळे डांबरी रस्त्याला मोठी तीन ते चार खड्डे पडले आहेत . त्याचा मोठा आवाज झाल्यामुळे इतर तीन म्हशी बाजूला पळाल्यामुळे वाचल्या , तर बाबुराव कांबळे पाठीमागे पळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान शिराळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, घटनेचा पंचनामा केला आहे. त्यात दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.