…आणि मिरंग सुरु झाला
बांबवडे : वैशाख वणव्याने जीवाची लाही, लाही झाली होती, उन्हाच्या तडाख्याने बळीराजा हैराण झाला होता.त्यातूनही जमिनीची मशागत करून पेरणी केली आहे. आणि वाट पाहत असलेल्या वरून राजाने हजेरी लावली ,आणि अखेर मिरंग सुरु झाला.
शेतकऱ्याने केलेला रोहिणीचा पेरा आता साधणार आहे. नेहमीच उशिरा येणारा मान्सून यंदा मात्र वेळेत हजार झाला आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी सुखावला आहे. उन्हाने हैराण झालेले नागरिक मृग नक्षत्राच्या पावसाच्या गारव्याने थंडावले आहेत. उन्हाच्या तडाख्याने कोरडी पडलेली नदीपात्रे निदान ओली तरी झाली आहेत. अद्याप ओढ्यांना पाणी जरी आले नाही, तरी यंदाचा पाऊस शेतकऱ्याला सुखावणार आहे, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.