विराट मराठा मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त
मुंबई : आज मुंबईत झालेल्या विराट मूक मोर्चामुळे अवघी मुंबापुरी हादरली,आणि आझाद मैदानावर जमा झालेल्या असंख्य मराठा बांधवांनी आपली ताकद दाखवली. आपल्या मागण्यांचे निवेदन मुलींनी मुख्यमंत्र्यांना दिले. आणि मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाच्या अनुषंगाने मराठा समाजासमोर मागण्या मान्यतेच्या अनेक घोषणा केल्या आहेत.
* प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुलांसाठी वस्तीगृह, * ओबीसींना मिळणारी सवलत मराठा विद्यार्थ्यांना मिळणार , * मराठा विद्यार्थ्यांना ५० % गुण असले तरी शिष्यवृत्ती मिळणार , * ३ लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण मिळणार, * शिक्षण आणि आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागणार, * आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, * ६०५ अभ्यासक्रमात मराठा विद्यार्थ्यांना सवलत, * कोपर्डी प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात,लवकरच निर्णय.
आदी आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विराट मोर्चाला दिलीअसून, प्रत्यक्षात मिळाल्याशिवाय यावर विश्वास बसणार नाही, अशी शंका मराठा मोर्चात सहभागी असलेल्या काही मोर्चेकरांन वाटत आहे.