कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस : अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी , तुळशी, दुधगंगा धरण क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. पंचगंगा, वारणा, भोगावती, नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ७ बंधारे पाण्याखाली गेले असून, येथील वहातुक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.