“निर्मल सागर सुंदरम्” या लघुनाट्याचा शुभारंभ
शिराळा : “निर्मल सागर सुंदरम्” या लघुनाट्याचा शुभारंभ ६ मे २०१७ रोजी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया व जुहू बीच येथे राज्यमंत्री व सागरी मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे साहेब यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती निर्माता – दिग्दर्शक अनंत खोचरे (टाकवेकर ) यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले कि ,सागरी महामंडळ (गृह विभाग ) यांचे ‘ निर्मल सागरतट अभियानांतर्गत जनजागृती व समाजप्रबोधन करणेसाठी “निर्मल सागर सुंदरम् ” हे लघुनाट्य संपूर्ण महाराष्ट्रातील कोकणकिनारपट्टी व मुंबईमध्ये गेट वे अॉफ इंडिया व जुहू बीच येथे सादर करण्यात येणार असून अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली या लघुनाट्याची निर्मिती करण्यात आली आहे.
या नाट्य पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर,घणसोली नवी मुंबईचे नगरसेवक प्रशांत पाटील , नगरसेविका उषाताई पाटील , सिंघम चित्रपटाचे कलादिग्दर्शक विशालजी सावंत, अभिनेते व अ.भा.चित्रपट महामंडळ भरारी पथकाचे सदस्य रंगराव घागरे यांच्या हस्ते झाले.