विनयभंग प्रकरणी २ वर्षांचा कारावास
शिराळा ( प्रतिनिधी ) : औंढी (ता.शिराळा) दादासाहेब संपत चव्हाण (वय २४ वर्षे )यास विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोन वर्षाच्या सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायाधीश बी.आर.पाटील यांनी सुनावली.
या बाबत समजलेली माहिती अशी, २२ डिसेंबर २०१४ रोजी रात्री दीड वाजता दादासाहेबने घरात घुसून विवाहितेचा विनय भंग केला होता. त्याबाबत आज शिक्षा सुनावण्यात आली असून, सरकारी वकील म्हणून एस.वाय. पाटील यांनी काम केले. तपास पोलीस हवालदार एस.आर.माने यांनी केला.