आंबा येथील तळवडे फाट्यावर एसटी व कर चा अपघात : १ जखमी
आंबा : कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावर आंबा येथील, तळवडे फाट्याजवळ एसटी व कार चा अपघात होवून एक जण जखमी झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर- गणपतीपुळे एसटी क्र.MH 14-BT-3077 या बस व बलॅनो कार क्र.MH08-AG-5298 ची धडक होवून हा अपघात झाला. या अपघातात अवधूत दत्तात्रय बाबर (वय ४७ वर्षे ) रहा.रत्नागिरी हे जखमी झाले आहेत. हा अपघात गाडी ओव्हरटेक करताना झाला असल्याचे समजते.