मांगले-सावर्डे बंधारा पाण्याखाली
शिराळा प्रतिनिधी (ता.२०): शिराळा वगळता तालुक्यात इतरत्र अतिवृष्ठी झाली असून धरण परिसरात २४ तासात १०० मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. मांगले-काखे पूल व मांगले-सावर्डे आणि कोकरुड रेठरे, पुनवत- माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शिराळा तालुक्याचा पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याशी असणारा जवळचा संपर्क तुटला आहे.
शिराळा तालुक्यात गेले चार दिवसापासून पावसाची संततधार कायम असून तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्ठी झाली आहे.
मांगले- काखे पूल बुधवारी रात्री पाण्याखाली गेला असल्याने शिराळा-कोडोली व वारणानगर ही एसटी सेवा बंद झाली असून चिकुर्डे व सागाव पुलावरून वाहतूक सुरु आहे. मांगले-सावर्डे बंधारा सकाळी पाण्याखाली गेला आहे.
मंडल निहाय झालेला पाऊस असा, सागाव ६५, शिरशी ६५,कोकरुड ६६, मांगले ६३, चरण ६४, शिराळा २९, वारणावती १०० मी.मी.
चांदोली धरण पातळी ६१४.४० मीटर तर पाणीसाठा ६६०.५० दश लक्ष घनमीटर असून धरणात २३.३० टी. एम.सी.म्हणजे ६७.८० टक्के पाणीसाठा झाला आहे.