१३ जूनला ‘ रेल रोको ‘ आंदोलन : शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली
नाशिक : १३ जून ला ‘ रेल रोको ‘ आंदोलन करणार असल्याची घोषणा, खासदार राजू शेट्टीं नी केली आहे. तसेच सरकारसोबत समन्वय समिती चर्चा करण्यास तयार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
आज गुरुवार दि.८ जून रोजी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समिती ची नाशिक इथं संपन्न झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
सध्या देशात ‘मर किसान ,मर जवान ‘ अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता अधिक करण्यात येणार आहे.
१२ जून ला प्रत्येल जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर १३ जून ला अत्यंत असे आक्रमक ‘रेल रोको ‘ आंदोलन करण्यात येणार आहे. याच्या माध्यामातून आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहचवली जाईल. असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून शेट्टी म्हणाले कि,तुमच्यात दम असेल,तर पहिली कुंडली माझी काढा.
यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, या सरकार ने शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे नोंद केले आहेत. चुकीचे गुन्हे आमच्यावर लावले, तर खरो खर दरोडे टाकू, असेही आमदार कडू यांनी सरकार ला ठणकावून सांगितले.