शाहुवाडी पंचायत समिती सभापती स्नेहा जाधव तर उपसभापती दिलीप पाटील ?
शाहुवाडी पंचायत समिती चे सभापती पद सर्व साधारण महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव असूनही, सभापती पद पनुंद्रे पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ.स्नेहा जाधव यांना मिळण्याचे संकेत येत आहेत. तर उपसभापती पदी भेडसगांव गणाचे सदस्य दिलीप पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
सभापती व उपसभापती पदाची निवड उद्या दि.१४ मार्च रोजी आहे.हि निवड जरी अधिकृत रित्या होणार असली तरी दोन्ही पदाचे उमेदवार ठरल्याचे समजत आहे.
सौ.स्नेहा जाधव या पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेस वासी आहेत. या जिल्हापरिषद ,पंचायत समिती निवडणुकी दरम्यान त्या शिवसेनेकडे आल्या. शिवसेनेच्या चिन्हावरील पहिले सभापती पद ,या अनुषंगाने त्यांना सभापती पद मिळत असल्याचे समजते.