साई हॉस्पिटल म्हणजे ग्रामीण जनतेला आरोग्याचा आधार – श्री. विश्वास नांगरे-पाटील
शिराळा ( प्रतिनिधी) : साई हॉस्पिटल मुळे ग्रामीण जनतेला आरोग्याची उत्तम सेवा तालुक्याच्या ठिकाणीच मिळणार आहे. असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केलं आहे.
येथील साई ऑर्थोपेडीक हॉस्पिटल च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर चे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे सरचिटणीस सत्यजित देशमुख, उपसभापती सम्राटसिंह नाईक आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. शैलेश माने यांनी केले. कार्यक्रमास अॅड. भगतसिंग नाईक, विजयराव नलवडे, डॉ. आबासाहेब पाटील, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. नितीन जाधव, डॉ.दीपक यादव, डॉ. एस.एन. पाटील, नगरसेवक अशोकराव पाटील, डॉ. एस.ए. कल्लोळी, डॉ.राहुल बडे, डॉ. धनपाल ऐनापुरे, डॉ.एस. डी. पुरोहित, डॉ.संतोष कल्लोळी, डॉ. लक्ष्मण माने, वसंतराव माने, डॉ. शीला माने, डॉ. योगिता माने उपस्थित होते. डॉ. बाबुराव माने यांनी आभार मानले.