१६ ऑक्टोबरला जनतेचा सरपंच कळणार
बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी १४ ऑक्टोबर ला मतदान होणार असून ,याचवेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
यासाठी २२ सप्टेंबर पासून अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबर हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असणार आहे.
१६ ऑक्टोबर ला जनतेतून थेट निवडलेला सरपंच कळणार असून, त्यानंतर गावच्या संचालकांची नावे कळतील. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रंग भरले जाणार आहेत. त्याची तयारी गणेश मंडळांना भेटी देवून सुरु झाली आहे.