उद्या दि.३ सप्टेंबर रोजी सरुडात दारूची बाटली आडवी होणार
सरूड : सरूड तालुका शाहुवाडी इथं दि.३ सप्टेंबर रोजी दारूबंदीसाठी मतदान होत आहे. उद्या सरुडात दारूची बाटली आडवी होणार. यासाठी महिला वर्गाने एल्गार पुकारला असून, याचे नेतृत्व गोकुळ च्या संचालिका सौ. अनुराधा ताई पाटील करीत आहेत.
या मोहिमेसाठी गेला महिनाभर महिला वर्ग जनजागृती करीत आहे. काल दि.१ सप्टेंबर रोजी या जनजागृती साठी गावातून महिलांची तसेच तरुण वर्गाची रॅली निघाली होती. या रॅली चे उद्घाटन आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या दारूबंदीसाठी मतदान घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. उद्या सकाळी ९ वाजलेपासून यासाठी मतदान होणार आहे. शेतकरी कुटुंबे उध्वस्त करणाऱ्या ‘ दारू ‘ च्या विरोधात महिलांसहित पुरुषवर्गाने देखील सहभाग घ्यावा, असा आग्रह महिलावर्गाकडून होत आहे. त्यास उत्तम प्रतिसाद काल झालेल्या जनजागृती रॅली च्या वेळी दिसून आला.