पाचवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २१.४३ तर आठवीचा १३.४५ टक्के
बांबवडे (प्रतिनिधी ) :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी दि.१७ मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीचा २१.४३ टक्के तर आठवीचा १३.४५ टक्के निकाल लागला आहे. हा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख ४५ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ लाख २६ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामधील १ लाख १२ हजार ८५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.