‘अगर इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा ‘ – मुरलीधर जाधव जिल्हाप्रमुख
आसुर्ले प्रतिनिधी : ‘ देश सोडावा लागला तरी चालेल,पण ‘ वंदेमातरम् ‘ म्हणणार नाही, तसेच मानेवर तलवार जरी ठेवली,तरी ‘ वंदेमातरम् ‘ म्हणणार नाही,असे विधानसभेत वक्तव्ये करणारे समाजवादी पार्टीचे आबू आझमी, आणि एम आय एम चे आमदार वारीस पठाण यांचा निषेध शाहुवाडी- पन्हाळा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.याहीपुढे जावून आबू आझमी जर कोल्हापुरात आले तर, त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय शिवसेना रहाणार नाही,असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी कोडोली परिसरातून मोटरसायकलची रॅली काढण्यात आली. तसेच आबू आझमी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कोडोली येथील शिवाजी महाराज चौकात दहन करण्यात आले .
यावेळी मुरलीधर जाधव पुढे म्हणाले कि, या भूमीला सर्व जणांनी पवित्र वंदन नित्य करावे, ज्यांना हे शक्य नसेल, त्यांनी या देशातून निघून जावे. या देशामध्ये राहता, या देशाची मीठ भाकर खाता, तुमचे सर्व विधी या देशात करता, आणि वंदे मातरम् म्हणत नाही. ‘अगर इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा ‘ असेही शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले .
यावेळी उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, पन्हाळा तालुका प्रमूख बाबासाहेब पाटील, उपतालुका प्रमुख सर्जेराव पोवार, ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख दिपक यादव, उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, तालुका प्रमूख रमेश कदम, शिवसैनिक अण्णासाहेब भिल्लारे, महिला अध्यक्षा मंगलताई चव्हाण, स्मिता सावंत, दिप्ती कोळेकर, संदीप पाटील, रवींद्र निंबाळकर, मोहन पाटील, अमर कदम, नितीन माने, अजित पाटील, प्रताप पाटील,व शिवसैनिक उपस्थित होते.