शिक्षण, आरोग्य आणि शेतीमाल ला “जीएसटी” तून मुक्ती
मुंबई :केंद्र शासनाने शिक्षण, आरोग्य, शेतीमाल, आदि १७ सेवांना “जीएसटी” च्या कचाट्यातून तूर्तास तरी मुक्त केले आहे. त्यामुळे सर्व सामान्य वर्गाला दिलासा मिळणार आहे.
१ जुलै पासून सर्व सेवांवर जीएसटी चा वाढीव बोजा बसणार असल्याची भीती वाटत असताना, केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी, असा काही बोजा सर्व सामान्यानंवर पडणार नसल्याचे स्पष्ट केले. तूर्तास १७ प्रकार जीएसटी च्या कक्षेबाहेर ठेवण्यात येणार आहेत. यात शिक्षण, आरोग्य, वहातुक यासह देवदर्शन, कौशल्य विकास, तसेच पत्रकारांशी संबंधित सेवा येणार असल्याची माहिती अधिया यांनी दिली.