कोल्हापुरात उष्माघाताचा बळी
कोल्हापूर : कोल्हापुरातील कुंभार गल्लीत उष्माघाताने एकाचा बळी घेतला आहे.
येथील शामराव सुतार ( वय ५० वर्षे ) रहाणार कुंभार गल्ली ,यांचा उष्माघाताने बळी गेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.सुतार हे फरशा बसवण्याचे काम करतात. दिवसभर काम झाल्यानंतर ते शेळके पुलाच्या कट्ट्यावर बसले होते.तेथेच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी त्यांना डॉक्टर कडे नेले असता डॉक्टरांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले.