“विश्वास विद्यानिकेतन”, चिखली ची गरुडभरारी
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ,अंतर्गत घेण्यात आलेल्या नॅशनल मेन्स मेरीट स्कॉलरशिप स्कीम (NMMS) परीक्षेत “विश्वास विद्यानिकेतन” चिखली येथील तब्बल ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून गरुडभरारी घेतली आहे.
या गुणवत्ता यादीत कु.प्रगती झिमल ,प्रतीक्षा चरणकर ,अनिकेत गरुड , जयदीप जाधव , अभय दारवटकर , हर्षद जानकर , विराज पाटील , दीपक नाईक , स्वप्नील शेगर , निखील पुजारी , साहिल तांबोळी ,या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून विद्यानिकेतनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
सदर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख मार्गदर्शक श्री. एस.एस. खुटाळे , व सहाय्यक श्री बी.एम. पाटील ,श्री. पी. डी. पाडवी ,व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. अमरसिंह नाईकसो (पापा) , कार्याध्यक्ष मा.श्री. रोहित नाईक ( भैया ) , प्राचार्य श्री एस.बी.देसाई सर, वसतिगृह अधीक्षक श्री.आर.के. पाटील सर यांची प्रेरणा मिळाली.
पुढील शैक्षणिक वर्षातील नियोजनानुसार या यशाबरोबरच आणखी यशमय वाटचाल करण्यासाठी NMMS बरोबर नवोदय, स्कॉलरशिप , MTS , NTS ,व भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ,NDA मार्गदर्शन , स्काऊट प्रशिक्षण ,MSCIT , यांच्या विशेष वर्गाचे आयोजन केले जात आहे.