कोल्हापूरच्या राजकारणात भाजपची सरशी
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा बसला,आणि वेध लागले सत्तास्थापनेचे. एकीकडे भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने आखलेली रणनीती शेवटच्याक्षणी ढेपाळली.सौ शौमिका अमल महाडिक या अध्यक्ष स्थानी विराजमान झाल्या. दुसरीकडे शेवटच्या क्षणापर्यंत विरोध दाखवत असलेल्या सेनेला उपाध्यक्ष पद मिळताच विरोध मावळला.आणि भाजप-शिवसेना युती जिल्हापरिषदेत पहिल्यांदाच सत्तेत आली. हि किमया महाडिकांच्या राजकारणाची कि, नाम.चंद्रकांतदादा यांच्या मुत्सद्दी राजकारणाची ,याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे.
दि.२० मार्च पर्यंत शिवसेना हि कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाणार,असेच चित्र दिसत असताना शेवटच्या क्षणी मात्र बाजी पालटली आणि भाजप आघाडी सत्तेत आली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी करिता हि मात्र धोक्याची घंटा म्हणण्यास हरकत नाही. कधीकाळी या जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शिवाय कोणीही दावा करीत नव्हते. किंबहुना तेवढी त्यांची क्षमता नव्हती.
एकंदरीत आजच्या घडामोडींवरून या दोघाही विरोधकांना आत्माचिंतनाची गरज भासू लागली आहे. केंद्रात भाजप राज्यात भाजप आणि आता स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजप आघाडीने आपले स्थान बळकट केल्याने कॉंग्रेस ,राष्ट्रवादी बरोबरच शिवसेनेला सुद्धा याचा विचार करावा लागणार आहे.