डोणोली त ११ वी च्या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या
बांबवडे प्रतिनिधी : डोणोली तालुका शाहुवाडी येथील १७ वर्षाच्या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना आज दि.२२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार डोणोली तालुका शाहुवाडी येथील सोहम राजाराम शेळके वय १७ वर्षे ) याने, आपली आई ओरडली, या रागापोटी गळफास लावून घेतल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोहम चा जागीच मृत्यू झाला. सोहम शेळके हा युवक ११ वी त शिकत होता.

सदरच्या घटनेने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सोहम चे शव, शवविच्छेदन प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय मलकापूर इथं पाठवण्यात आले आहे.