” परिश्रमाचं चीज झालं “- श्री भगतसिंग चौगुले सरपंच बांबवडे
बांबवडे :: बांबवडे तालुका शाहुवाडी येथील श्री विजय जयवंत कांबळे यांना रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती च्या वतीने आदर्श सचिव पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.
विजय कांबळे हे इंजाईदेवी वि.का.स. सेवा संस्था यांचे सचिव आहेत. सध्या चार संस्थांचे सचिव पद ते सांभाळत आहे. डोणोली, सवते, शाहुवाडी, परखंदळे.आजपर्यंत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरत नाहीत. म्हणूनच शाहुवाडी तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष पद त्यांना लाभले. याचबरोबर उदय साखर कारखाना तोडणी वाहतूक संस्थेचे ते संचालक आहेत.
योग्य कारभार आणि विनम्र स्वभाव एवढीच संपत्ती घेवून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. गेली वीस वर्षे या वि.का.स. सेवा संस्थांच्या कारभारात ते सहभागी आहेत.
श्री मानसिंगराव गायकवाड, दादा, श्री रणवीरसिंग गायकवाड सरकार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेलं हे व्यक्तिमत्व कामाव्यतिरिक्त सुद्धा लोकांशी प्रामाणिक आणि समर्पण भावनेने काम करतात. सध्याच्या घडीला त्यांची पत्नी सौ सुनिता विजय कांबळे या बांबवडे गावाच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. बांबवडे गावाच्या वतीने सुद्धा श्री विजय कांबळे यांचे हार्दिक अभिनंदन गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.