बांबवडे इथं लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न
बांबवडे इथं लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष विकास साठे, उपाध्यक्ष विशाल साठे यांनी या जयंती चे आयोजन केले होते.
यावेळी पत्रकार मुकुंद पवार यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र एकीकरण चळवळीत महत्वाची भूमिका बजावली होती, त्याबाबत सांगून त्यांच्या समर्पणाचे महत्व उपस्थितांना सांगितले.
विकास साठे यांनी देखील लोकशाहीर यांनी झोपलेल्या समाजाला जागे करण्याचे काम केले, असे आपल्या मनोगतात सांगितले.
भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी देखील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि समाज यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री सुरेश नारकर, दीपक निकम, विजय कांबळे, अमर निकम, पांडुरंग निकम , आनंदराव प्रभावळे, गजानन निकम, अमर चव्हाण, शरद निकम, गणेश सातपुते, वाहतूक नियंत्रक कांबळे, पोलीस पाटील संजय कांबळे, पोलीस कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.