संत निरंकारी मंडळ शिराळा च्यावतीने सागाव नदी ” स्वच्छ जल, स्वच्छ मन ” अभियान संपन्न
शिराळा प्रतिनिधी : सागाव तालुका शिराळा इथं संत निरंकारी मंडळ रजि. दिल्ली यांच्या वतीने वारणा नदी परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

संत निरंकारी मंडळ ( रजि. ) दिल्ली यांच्यामार्फत भारतामध्ये सर्व राज्यात ” स्वच्छ जल, स्वच्छ मन ” हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

य उपक्रमाद्वारे संत निरंकारी मंडळांच्या अनुयायांनी सर्व ठिकाणी नदी पत्रातील केर कचरा, झाडी-झुडपे, यांची साफसफाई केली. व पाणी स्वच्छतेचा उपक्रम राबविला आहे.

संत निरंकारी मंडळांच्या सद्गुरू माता सुदीक्षा हरदेव सिंह जी महाराज यांच्या वचनानुसार सर्व ठिकाणी या उपक्रमाचे अनुकरण करण्यात आले. तसेच त्यांच्या उपदेशाप्रमाणे जल स्वच्छ असेल, तर त्याचा उपयोग सर्वांनाच होतो. त्याच पद्धतीने सर्वांचे मन स्वच्छ व निर्मळ असेल, तर मनुष्य जन्म सार्थकी लागेल.

संत निरंकारी मंडळ ( रजि. ) दिल्ली शाखा शिराळा येथील संत निरंकारी मंडळ यांनी सागाव या गावी जावून नदी पात्रातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील साफसफाई करून, हा उपक्रम राबविला आहे.

यावेळी गावाचे सरपंच व संत निरंकारी मंडळाचे शिराळा तालुका प्रमुख धनाजी पाटील महिला व पुरुष सेवादल व शिराळा तालुक्यातील सर्व सत्संग उपस्थित होते.