राजकीयसामाजिक

सत्यजित आबा खासदार,तर रणवीरसिंग सरकार आमदार ?कार्यकर्त्यांची अपेक्षा

बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार श्री सत्यजित पाटील सरुडकर हे निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दाखवला जात आहे. याचबरोबर सत्यजित आबा खासदार ,तर रणवीरसिंग गायकवाड हे आमदार होणार अशी अपेक्षा सुद्धा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत सोशल मिडिया वरून देखील चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान सत्यजित पाटील आबा हे महाविकास आघाडी चे उमेदवार आहेत. जर त्यांचा विजय झाला, तर ते खासदार होतील, हे जरी खरे असले तरी, रणवीर सिंग गायकवाड यांना आमदार करताना अनेक समीकरणे बदलावी लागणार आहेत.


केडीसिसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड सरकार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित दादा गटाचे समर्थक आहेत. जर रणवीरसिंग यांना विधानसभा लढवायची असेल तर महाविकास आघाडी मध्ये त्यांना सामील व्हावे लागणार आहे. यासाठी त्यांना शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात सामील व्हावे लागणार आहे. तरच त्यांना विधानसभा महाविकास आघाडी च्या वतीने लढवता येणार आहे. परंतु शाहुवाडी तालुक्यातील उत्साही कार्यकर्ते रणवीरसिंग यांना आमदार पदावर पहात आहेत. एकंदरीत लोकसभेचा निकाल तोंडावर आला आहे.

यामुळे सत्यजित पाटील विजयी होणार अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. याहीपुढे जावून रणवीरसिंग यांना आमदार पदावर पाहताना उत्साही कार्यकर्ते दिसत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!