कै.येसाबाई दुध संस्थेच्यावतीने सभापती सरनोबत यांचा सत्कार
आसुर्ले (प्रतिनिधी) मोहन घोडके : पन्हाळा पंचायत समिती सभापती श्री.पृथ्वीराज सरनोबत यांचा कै.येसाबाई महिला सहकारी दुध संस्थेचे मार्गदर्शक श्री.शामराव मोळे या संस्थेचे चेअरमन , व्हा.चेअरमन ,संचालक, कार्यकारी मंडळ व सभासद यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती पदी श्री. पृथ्वीराज सरनोबत आणि उपसभापती सौ.उज्वला पाटील यांची निवड झाली आहे.यानिम्मित हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी श्री.पृथ्वीराज सरनोबत यांनी तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.