फरशी दुरुस्त न केल्यास आंदोलन करु — विजय खोत.
सोंडोली (प्रतिनिधी ) :मालेवाडी – सोंडोली परीसरातील शेती कानसा नदीच्या पाण्यावर अवलंबून असून गेली आठवड्यापासून येथे पाण्याविना पिके होरपळून जात आहेत. येथील सोंडोली – मालेवाडी दरम्यान असनारी फरशी ना दुरुस्त असल्याने येथे पाण्याचा थेंब साचत नाही. आजून उन्हाळा चार महीने असून आता पासूनच कानसा नदी कोरडी पडत आहे.हे जर असच राहिल्यास हाता तोंडाला आलेली पिके वाया जातील. ही जर सबंधीत खात्याने फरशी दुरुस्तीचे काम लवकर चालू न केल्यास या विभागातील शेतकऱ्यांसह काडंवण धरणावर तिव्र आदोंलन करणार असल्याचे मत शाहूवाडी पं. स. सद्स्य व जनसुराज्यशक्ती चे युवा नेते विजय खोत यांनी मांडले.