नाम.सदाभाऊ यांना ४ जुलै पर्यंत अल्टीमेटम : खास. राजू शेट्टी
बांबवडे :आपण चळवळीतील कार्यकर्ते असून, कोणत्याही कार्यकर्त्याने चळवळीशी केलेली प्रतारणा खपवून घेतली जाणार नाही, यासाठी च एकेकाळी स्वभिमानीची मुलुख मैदानी तोफ असलेल्या नाम. सदाभाऊ खोत यांना ४ जुलै पर्यंत संघटनेच्या चौकशी समिती समोर खुलासा देण्याचे आवाहन केले आहे, असे मत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले कि, नाम. सदाभाऊ खोत हे चळवळीतील खंदे समर्थक म्हणून त्यांची वर्णी शासन दरबारी आपला एक घटक असावा, म्हणून केली होती. परंतु पुणतांबे येथील शेतकरी प्रकरणात त्यांनी शेतकऱ्यांची बाजू सोडून, भाजप शासनाचे प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावली. एकंदरीत शेतकऱ्यांच्या चळवळीशी त्यांनी प्रतारणा केली. यासंबंधित त्यांनी आपली बाजू चौकशी समिती समोर मांडावी,यातून समिती जो निर्णय घेईल, त्याचाच विचार संघटना करेल, असेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.