कालिका पतसंस्थेचे बांबवडे नागरी पतसंस्थेत विलीनीकरण : श्री अल्लाबक्ष मुल्ला
बांबवडे : कालिका सह. पतसंस्थेचे, बांबवडे नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विलीनीकरण करण्यात आले असून ,कालिका पतसंस्थेच्या सर्व ग्राहकांनी इथून पुढचे व्यवहार बांबवडे नागरी पतसंस्थेत करावे, असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अल्लाबाक्ष मुल्ला यांनी केले आहे.
कालिका सह. पतसंस्था, हि शित्तूर-वारुण तालुका शाहुवाडी येथील आहे. या संस्थेचे विलीनीकरण बांबवडे नागरी सह.पतसंस्थेत झाले आहे. अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुल्ला यांनी ‘ एसपीएस न्यूज ‘ ला दिली . यापुढे कालिका संस्थेच्या सर्व ग्राहकांनी पुढील व्यवहार बांबवडे नागरी पतसंस्थेत करावे. इथेही त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल. तसेच ग्राहकांच्या हिताची जोपासना केली जाईल, असेही श्री मुल्ला यांनी सांगितले.