९ ऑगस्ट ‘ क्रांतीदिनी ‘ मराठा मूक मोर्चा
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी येत्या ९ऑगस्ट ला राणीबाग भायखळा ते आझाद मैदान असा मराठा मूक मोर्चा निघणार असल्याचे , मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान मुंबई चा मराठा मूक मोर्चा विविध कारणांनी लांबत होता. मराठा समाजाची ताकद शासनाला दाखवून देण्यासोबतच, अनेक मागण्या या मोर्चाच्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावे, शेतीमालाला हमीभाव मिळावा,आणि अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवावा, अशा मागण्या या मराठा मूक मोर्चाच्या आहेत. येत्या ६ जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या मोर्चाची जनजागृती होण्यासाठी व्यापक अभियानाला सुरुवात होणार आहे. तसेच १३ जुलै ला क्रांतीज्योतीला श्रधांजली वाहून अभियानाचा आढावा घेतला जाणार आहे.