तिघांच्या विरोधात शिराळा पोलिसात मारहाणीची फिर्याद
शिराळा : मांगले तालुका शिराळा येथील रमेश केशव दिवे ( वय ४० वर्षे ),यास कुऱ्हाडीने व लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी, तिघा जणांवर शिराळा पोलीस ठाण्यात जखमी रमेश दिवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. ४ जुलै रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान पूर्वीचा राग मनात धरून कमलाकर आनंदराव पाटील, किशोर कमलाकर पाटील, मंगेश कमलाकर पाटील यांनी घरात येवून मारहाण केली.
याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार जयसिंग पाटील करीत आहेत.