माणुसकीचा नितळ झरा म्हणजे महेश, गरजूंची आशा म्हणजे महेश, कर्तव्याची जाण म्हणजे महेश…
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील नवयुवक महेश जयसिंग निकम यांचा आज वाढदिवस.यानिमित्त थोडंसं आमच्या महेशबद्दल…
आमचा महेश ,हे शब्दच मुळी आपुलकीची भावना दर्शवून जातात. महेश हे व्यक्तिमत्वं नेहमीच गरजूंसाठी सहकार्याचे हात ठरलेत. हा युवक सैन्यात आपली सेवा बजावत आहे, परंतु आपल्या मातीशी जुळलेली नाळ नेहमीच जागृत ठेवत असतो. ते त्यांच्या कर्तुत्वातून दिसते. प्रत्येकासाठी मदत करणे,हे महेश स्वत:चे कर्तव्य समजतो.
माणुसकीचा नितळ झरा म्हणजे महेश, गरजूंची आशा म्हणजे महेश, कर्तव्याची जाण म्हणजे महेश…
महेश विषयी जितकं बोलू तितकं थोडं आहे. आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुरोग्य लाभो,भविष्यात यशवंत व्हा,कीर्तिवंत व्हा, आपल्या कर्तुत्वाला आभाळाची उंची लाभो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना.