चिखलीत एक लाख २९५०० रुपयांची चोरी
शिराळा (प्रतिनिधी) : चिखली तालुका शिराळा येथील दत्तात्रय महादेव साळुंखे यांच्या रहात्या घरात अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदी, मोबाईल व रोख वीस हजार रुपये असा एकूण १,२९,५००/-रु. किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत दत्तात्रय साळुंखे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हि घटना रविवारी रात्री दहाच्या नंतर घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि,अज्ञात चोरट्यांनी जनावरांच्या गोठ्यातून येवून , घरातील दरवाजाचा आडणा काढला. मधघरात असलेल्या तिजोरीतून सोने, चांदी, मोबाईल व रोख २० हजार रुपये, असा ऐवज लंपास केला .
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.