विजेच्या उच्चदाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान : कापरीतील घटना
शिराळा ( प्रतिनिधी ) : कापरी तालुका शिराळा इथं अचानक झालेल्या उच्चदाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे गावातील बल्ब, पंखे, टीव्ही ,चार्जर जळून, जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले आहे. हि घटना आज दुपारी साडेबारा वाजणेच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरात पंखे नियमित चालू असतात. दुपारी साडेबारा वाजणेच्या सुमारास अचानक उच्चदाबाचा विद्युत पुरवठा झाल्याने घरातील पंखे, टीव्ही, फ्रीज, चार्जर जळाले. पंखे बंद पडल्याने, बल्ब फुटल्याने लोकांना फक्त आपल्याच घरात असे का घडले, असं वाटलं. परंतु त्यांनी शेजाऱ्यांच्या घरात चौकशी केली असता, त्यांच्याकडेही असेच घडल्याचे समजले. संदीप मारुती पाटील यांचा डीश , फ्रीज, पंखा , सुभाष पाटील यांचा टीव्ही, संजय पाटील यांचा टीव्ही व पंखा, विठ्ठल पाटील यांचा टीव्ही व पंखा, अशोक जाधव यांचा टीव्ही, लक्ष्मी जाधव यांचा टीव्ही, तानाजी पाटील यांचा टीव्ही ,पंखा, वसंत पाटील यांचा टीव्ही व फ्रीज तर प्रत्येक घरातील पंखे,व चार्जर जळाले,तर काही ठिकाणी बल्ब चा स्फोट झाला. उच्च दाबामुळे वीजपुरवठा तातडीने खंडित न होता, तसाच सुरु राहिल्याने अनेकांना याचा फटका बसला. त्यानंतर लोकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधून हि, माहिती दिली.