बांबवडेत कापड दुकान फोडले : तिघा अल्पवयीन मुलांना अटक
बांबवडे ( प्रतिनिधी ) बांबवडे तालुका शाहुवाडी इथं पिशवी रस्त्यावर असलेल्या राज कलेक्शन या कापड दुकानात ,दुकानावरील कौले काढून तिघा अल्पवयीन मुलांनी बुधवारी रात्री १ ते ३ च्या दरम्यान चोरी केली. या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे ६५ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,तौफिक अल्ताफ भेंडीगिरी (वय १६ वर्षे ), अब्दुल जाफर सौलूर (वय १४ वर्षे ), सादिक बुलोरी नारबंद ( वय १३ वर्षे ) या तिघांनी बांबवडे येथील पिशवी रस्त्यावर असलेल्या राज कलेक्शन या कापड दुकानात चोरी करून कापड व काही रोकड घेवून पोबारा केला. दरम्यान येथीलच विश्वास बळवंत यादव यांची दुचाकी सुद्धा चोरली. हि चोरी करून हे तिघे कोल्हापूर ला निघाले असता, केर्ली तालुका करवीर इथं त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले, त्यामुळे ती दुचाकी तिथेच टाकून निघाले असता, तिथल्या ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली, व त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. तेंव्हा आपण ,दुचाकी व कपडे तसेच रोकड बांबवडे इथून चोरल्याचे त्यांनी काबुल केले.
दरम्यान सुमारे ६५ हजार रुपयांचा माल या तिघांकडून पोलिसांनी हस्तगत केला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, हवालदार विश्वास चिले, सर्जेराव पाटील, आर.आर.पाटील, तुकाराम कुंभार आदि पोलीस कर्मचारी करीत आहेत.