करणीच्या माध्यमातून फसवणूक बद्दल चौघांना अटक
मलकापूर प्रतिनिधी:
नातेवाईकांनी केलेली करणी काढून देतो त्याच बरोबर सेवा काळातील अडकलेले पैसे काढून देतो असे सांगून निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक केल्या प्रकरणी आंबा तालुका शाहुवाडी येथील आबासाहेब केशव पाटील यांच्या सह त्याच्या साथीदारांना शाहुवाडी पोलीसानी अटक करून न्याया लयात हजर केले असता .दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलिसांतून मिळाले ल्या माहिती नुसार विश्रामबाग सांगली येथील निवृत्त प्राध्यापक भालचंद्र सुर्यवंशी यांचे कडून सूमारे63000हजार रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आबासाहेब पाटील रा आंबा, कृष्णा शंकर खाडे ,सौ कलावती कृष्णा खाडे ,रा खरवते तालुका राजापूर, सहदेव लक्ष्मण धाडी रा राजापूर या चौघांना शाहुवाडी पोलीसानी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना 8एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शाहुवाडी मलकापूर चे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए ए वाळूजंकर यांनी दिले