पन्हाळा पोलीस ठाणेवर बावडा कुंभार संघटनेचा मोर्चा
कोडोली प्रतिनिधी(सनी काळे):
पन्हाळा तालुक्यातील पोंर्ले येथील रघुनाथ कुंभार यांनी काही दिवसापूर्वी गावाजवळील शेतात आत्महत्या केली होती. यांच्या आत्महत्येचा कारण अद्याप स्पष्ट झाले नसून,त्यांच्या खिश्यामध्ये सापडलेल्या चिठीमध्ये गावातील दोन सावकारी नावे असून त्यांना ताबडतोब अटक करा या मागणीसाठी पन्हाळा बावडा कुंभार समाज संघटनेच्यावतीने आज पन्हाळा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील रघुनाथ कुंभार यांनी दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी गावाजवळील शेतात आत्महत्या केली होती.याबाबत पन्हाळा पोलीस तपास करत आहेत.पण रघुनाथ यांच्या खिशात एक चिठी होती आणि त्या चिठीमध्ये गावातीलच दोन सावकार महादेव बाळू उबाळे आणि महादेव शामराव शिंदे यांच्याकडून सावरकरकीचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा उल्लेख असल्याचे संघठनेच म्हणने आहे, आणि म्हणून त्या दिशेन तपास करून दोषींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी पन्हाळा बावडा कुंभार संघटनेने पन्हाळा पोलिसांना निवेदन दिले आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र कुंभार, विक्रम कुंभार, प्रकाश सर्वदेकर , संजय गोरंबेकर आदी उपस्थित होते.